मोकळ्या जागेतील अनधिकृत फेरीवाले हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकळ्या जागेतील अनधिकृत फेरीवाले हटवा
मोकळ्या जागेतील अनधिकृत फेरीवाले हटवा

मोकळ्या जागेतील अनधिकृत फेरीवाले हटवा

sakal_logo
By

खारघर, ता. १० (बातमीदार) : येथील सेक्टर १४ मधील शहीद योगेश पाटील पेट्रोल पंपशेजारील मोकळ्या जागेत काही फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे व्यवसाय थाटले आहेत. सदर फेरीवाल्यांवर कारवाई करून सदर जागा मोकळी करावी, असे पत्र खारघर भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना दिले आहे.

खारघर परिसरात फेरीवाल्यांनी अनेक ठिकाणी पदपथ अडवून अनधिकृतपणे व्यवसाय थाटला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून थातूरमातूर कारवाई केली जाते. खारघरमध्ये दिवसेंदिवस फेरीवाल्यांची वाढ होत आहे. त्यात खारघर, सेक्टर १४ शहीद पेट्रोल पंपाशेजारी आणि सार्वजनिक स्वच्छतागृहासमोरील मोकळ्या जागेत काही दिवसांपासून फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे व्यवसाय थाटला आहे. फेरीवाले रस्त्याचा कडेला अनधिकृतपणे व्यवसाय करीत असून पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याविषयी पालिकेने त्वरित कारवाई करून जागा मोकळी करावी, असे पत्र ब्रिजेश पटेल यांनी दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81756 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top