तळोजा वसाहतीला सुविधांचे वावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोजा वसाहतीला सुविधांचे वावडे
तळोजा वसाहतीला सुविधांचे वावडे

तळोजा वसाहतीला सुविधांचे वावडे

sakal_logo
By

खारघर, ता. १० (बातमीदार) : तळोजा वसाहत आणि परिसरातील गावांची लोकसंख्या पन्नास हजाराच्या घरात आहे; मात्र वसाहती सरकारी शाळा, आरोग्य केंद्र, डाकघर, अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने तळोजा वसाहतीत पालिकेची शाळा, आरोग्य केंद्र आणि अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सिडकोने खारघरनंतर तळोजा वसाहत निर्माण करताना बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वेचे उद्‍घाटन केल्यामुळे विकसकांनी सिडकोकडून भूखंड घेऊन इमारती उभ्या करण्यास सुरुवात केली. मेट्रोचा प्रवास सुखकर होणार असल्यामुळे अनेकांनी मार्गालगत घरे घेण्यास सुरुवात केली; तर सात वर्षांपूर्वी सिडकोने सर्वसामान्य कुटुंबांसाठी तळोज्यामध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभारले. आज गृहनिर्माण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आले आहेत. वसाहतीलगत असलेल्या पेठाली, भोइरपाडा, तळोजे मजकूर आदी गावांचा विकास झाल्यामुळे परिसरात भाडेकरूची संख्या अधिक आहे.

वसाहतीच्या विकासात भर पडू लागल्यामुळे खासगी शाळा, रुग्णालय, बॅंका, शोरूम व दुकानांत भर पडली; मात्र आजही वसाहतीत जलकुंभ नाही, तसेच पालिकेची शाळा आणि आरोग्य केंद्र, अग्निशमन केंद्र आणि डाकघर कार्यालय नाही. आरोग्य केंद्र नसल्यामुळे रहिवाशांनी खासगी रुग्णालयात गाठावे लागते. तसेच आगीच्या घटना घडल्यास तळोजा औद्योगिक क्षेत्र अथवा खारघर किंवा कळंबोली येथील अग्निशमन केंद्राची मदत घ्यावी लागते.

तळोजा मजकूर येथील सर्वे नं १०९/१ मध्ये पालिकेकडून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र पालिकेने वर्षभरापूर्वी दिले होते; मात्र अद्यापही आरोग्य केंद्र सुरू केले नाही.
- अंकुश गायकवाड, काँग्रेस कार्यकर्ता, तळोजा वसाहत

तळोजा वसाहतीचे पालिकेकडे हस्तांतरण झाल्यास सिडकोने राखीव ठेवलेल्या भूखंडाची माहिती मिळेल. तसेच तळोजा परिसरात गुरुचरणची जमीन आहे. सदर जमीन पालिकेला मिळाल्यास शाळा, डाकघर, अग्निशमन केंद्र उभारता येईल.
- हरेश केणी, नगरसेवक

तळोजा मजकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच बांधकामाला सुरुवात होईल.
- आनंद गोसावी, आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81758 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top