मुंबईकरांना अनुभवता येणार क्रिकेट लढतींचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांना अनुभवता येणार क्रिकेट लढतींचा थरार
मुंबईकरांना अनुभवता येणार क्रिकेट लढतींचा थरार

मुंबईकरांना अनुभवता येणार क्रिकेट लढतींचा थरार

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १० (बातमीदार) : वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित मुंबईभर चालणाऱ्या उन्हाळी शिबिर संघांच्या कुमार निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील लढतींचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.
वरळी येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या अजित नाईक स्मृती या कुमार निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचा आरंभ नुकताच झाला. या वेळी स्थानिक क्रिकेट खेळाडू राजा पोतदार यांच्या हस्ते घंटानाद करण्यात आला. मुंबईतील प्रतिष्ठेच्या क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेचे हे रौप्य महोत्सवी वर्षं असून मुंबईतील विविध मैदानांवर ही स्पर्धा रंगणार असल्याचे स्पर्धा संचालक संदीप सरमळकर यांनी सांगितले. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला असून १७ मेपर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचे वरळी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81766 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top