कोमात असलेल्या सहकाऱ्याला मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोमात असलेल्या सहकाऱ्याला मदतीचा हात
कोमात असलेल्या सहकाऱ्याला मदतीचा हात

कोमात असलेल्या सहकाऱ्याला मदतीचा हात

sakal_logo
By

मुकेश धावडे : सकाळ वृत्तसेवा

वडाळा, ता. १० : पूर्ण सेवाकाळ गुन्हे शाखेत काढला. कर्तव्य बजावताना चांगल्या प्रकारे, इमानदारीने, सचोटीने यश संपादन केले. गुन्हेगारांना पकडण्यात तसेच खबरीमार्फत खबर मिळविण्यात त्यांचा हातखंडा होता; परंतु अकाली अपघाताने कोमात जाऊन अंथरुणाला खिळलेल्या आपल्या पोलिस सहकाऱ्याला मदतीचा हात देऊन १९८७ च्या बॅचचे मुंबई पोलिस अकोला आरपीटीएसने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
पोलिस हवालदार मनोहर भोसले ऊर्फ बापू हे गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. १२ सप्टेंबर २०२० ला रात्री ९ च्या सुमारास युनिट-६ चेंबूर येथून कर्तव्य बजावून ते दुचाकीने घरी जाण्यास निघाले असता वाशी गाव आरसीएफ फॅक्टरी रोड येथे गतिरोधकावर आदळून त्यांचा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ मुलुंडमधील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर शस्त्रकिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचार देऊन ६ ऑक्टोबर २०२०ला घरी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर आजतागायत ते कोमामध्ये आहेत.
युनिट- ६ च्या सहकाऱ्यांनी भोसले यांना त्या वेळी मदत केली; परंतु सद्यस्थितीत त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. औषधोपचार व घरखर्च यामुळे भोसले कुटुंबीयांवर आर्थिक स्थिती ओढावली आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून सन १९८७ च्या बॅचने एकत्र येत ९७ हजार ५०० रुपये जमा करून वडाळा पश्चिमेतील उद्योग भवन या त्यांच्या राहत्या घरी पत्नी मानसी यांच्याकडे मंगळवारी (ता. १०) सुपूर्द केली. दिलीप तुकाराम सावंत व गणपत भिसे यांनी या मदतीसाठी पुढाकार घेतला. पोलिस मित्रांनी आपल्या सहकारी मित्रासाठी केलेली मदत समाजात नवा आदर्श निर्माण करणारी ठरत आहे.

मदतीचे आवाहन
हवालदार मनोहर भोसले यांच्या औषधोपचाराच्या वाढत्या खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी त्यांचा मुलगा इशांत (१५) हा अल्पवयीन असल्याने त्याला पोलिस दलात बालशिपाई या पदावर नियुक्त करण्याबाबत पोलिस सहकारी प्रयत्न करीत आहोत. बॅचच्या सहकाऱ्यांनी पोलिस मित्रांना भोसले कुटुंबीयांना मदतीसाठी (संपक्र क्र. ९८२११९७५५३) भावनिक आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81768 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top