कल्याण-डोंबवलीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-डोंबवलीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
कल्याण-डोंबवलीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य

कल्याण-डोंबवलीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य

sakal_logo
By

कल्याण, ता. १० (बातमीदार) ः स्वच्छ आणि सुंदर कल्याण-डोंबिवली शहर, कचराकुंड्यामुक्त शहर अशी जाहिरात महापालिकेकडून करण्यात येते. मात्र, सध्या कल्याण पूर्वमधील हाजी मलंग रस्ता तसेच पालिका हद्दीतील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेची स्वच्छता मोहीम कागदावरच असल्याची टीका नागरिक करत आहेत.
सहयोग सामाजिक संघटना अध्यक्ष विजय भोसले यांनी सांगितले की, जेथे स्वच्छता, चांगले रस्ते आहेत तेथे पालिका स्वच्छता अभियान राबवते; मात्र जेथे कचऱ्याचा बिकट प्रश्न आहे तेथे दुर्लक्ष करते. कचरा समस्येबाबत पालिका अधिकारी, कर्मचारी गंभीर नसल्याचा आरोपदेखील विजय भोसले यांनी केला आहे.

मी नुकताच घनकचरा विभागाचा पदभार स्वीकारला आहे. कचरा प्रश्न लवकरच दूर करू.
- बाळासाहेब चव्हाण, उपायुक्त, कल्याण-डोंबिवली पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81776 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top