द्रोणागिरी नोडमध्ये आगरी-कोळी भवन उभारावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रोणागिरी नोडमध्ये आगरी-कोळी भवन उभारावे
द्रोणागिरी नोडमध्ये आगरी-कोळी भवन उभारावे

द्रोणागिरी नोडमध्ये आगरी-कोळी भवन उभारावे

sakal_logo
By

बेलापूर, ता. १० (बातमीदार) : सिडकोने द्रोणागिरी नोडमध्ये आगरी-कोळी भवनाची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे. नवी मुंबईमध्ये ९५ गावांची शेतजमीन संपादित करून सिडकोने औद्योगिक वसाहतीसह मूळ गावठाण कायम ठेवत नागरी वसाहती उभारल्या आहेत. यामध्ये उरणमधील २८ गावांची शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र उरणामधील २८ गावांमधील बहुसंख्येने असणाऱ्या आगरी, कोळी, कराडी लोकांची शेतजमीन या भूसंपादनात समाविष्ट करण्यात आली आहे. या लोकांची पारंपारिक संस्कृती जपण्याचे काम सिडकोने आजपर्यंत करण्याची टाळाटाळ केली आहे. उरण द्रोनागिरी नोडमध्ये अशा सामाजिक सुविधांसाठी आरक्षित असणाऱ्या भूखंडावर सिडकोने आगरी, कोळी, कराडी लोकांची संस्कृती जपण्यासाठी आगरी कोळी भवनाची निर्मिती करावी, अशी मागणी सिडकोकडे करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81777 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top