पवईत कराटे उत्तीर्णांना प्रमाणपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवईत कराटे उत्तीर्णांना प्रमाणपत्र
पवईत कराटे उत्तीर्णांना प्रमाणपत्र

पवईत कराटे उत्तीर्णांना प्रमाणपत्र

sakal_logo
By

मालाड, ता. १० (बातमीदार) ः एशियन शितो-रियु स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशनच्या शाखा आयआयटी पवईतर्फे कराटे विद्यार्थ्यांची कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली होती. यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कराटे बेल्ट व प्रमाण पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी प्रवीण बैरागी, अशोक हिवराळे संजय गवाळे, विक्रम घोरपडे, अमृत भिमराव जबडे, प्रवीण बैरागी, अशोक हिवराळे, राज अरुण शिंदे, आनंद काकडे, डॉ. वर्षा महेश आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आयआयटी पवईचे मुख्य कराटे प्रशिक्षक अमृत भीमराव जबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गेल्या २५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना जुडो-कराटेचे प्रशिक्षण देत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन हे विद्यार्थी देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81778 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top