बाटलीच्या झाकणांपासून चित्रनिर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाटलीच्या झाकणांपासून चित्रनिर्मिती
बाटलीच्या झाकणांपासून चित्रनिर्मिती

बाटलीच्या झाकणांपासून चित्रनिर्मिती

sakal_logo
By

घणसोली, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या पेट कॉर्नर येथे टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना अमलात आणली आहे. बाटलीच्या झाकणापासून भिंतीवर चित्रनिर्मिती केल्याने महापालिकेच्या उपक्रमाची चर्चा सध्या सुरू आहे.

पाळीव प्राण्यांना शौचासाठी सार्वजनिक ठिकाणी घेऊन येणाऱ्या नागरिकांनी शहर स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांच्या विष्ठेची स्वतः विल्हेवाट लावावी, यासाठी पेट कॉर्नर ही अभिनव संकल्पना शहरात राबविण्यात येत आहे. याच संकल्पनेत नवी मुंबई महापालिकेने टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा उपयोग करून पेट कॉर्नरला अनोखे रूप दिले आहे. बेलापूर जेट्टी बाहेरील पेट कॉर्नर येथे उभारण्यात आलेल्या भिंतीवर बाटलीच्या झाकणाच्या साह्याने चित्र रंगवण्यात आले आहे. या चित्रासाठी महापालिकेने हजारांच्या घरात झाकणांचा उपयोग केला आहे. या चित्रात काही पाळीव श्वान, त्यांचे मालक येथे आल्याचे दाखवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81779 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top