अल्‍पवयीन मुलीला सव्वा लाखाला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 १६ वर्षीय मुलीसोबत सोशल मीडियावरून ओळख वाढवून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली
अल्‍पवयीन मुलीला सव्वा लाखाला गंडा

अल्‍पवयीन मुलीला सव्वा लाखाला गंडा

नवी मुंबई : गुजरातमध्ये राहणाऱ्या एकाने नेरूळमधील बांधकाम व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलीसोबत सोशल मीडियावरून ओळख वाढवून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रदीप परमार असे तरुणाचे नाव असून नेरूळ पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार बांधकाम व्यावसायिक नेरूळमध्ये कुटुंबासह राहत असून त्यांची मुलगी इन्स्टाग्रामवर असल्याने गुजरातमधील संजय चौहान नावाच्या तरुणाने दोन वर्षांपूर्वी तिच्याशी मैत्री केली.

संजय चौहानने इन्स्टाग्रामद्वारे तिची प्रदीप परमारसोबत ओळख करून दिली. मुलीचे व परमारचे नियमित बोलणे व्हायचे. त्‍या वेळी त्‍याने आपल्‍या गरिबीचे कारण सांगून तिच्याकडे पैशाची मागणी केली. दुकान सुरू करण्यासाठी त्‍याने मुलीकडे वारंवार पैसे मागितल्‍याने तिने वडिलांच्या नकळत गुगल पे-द्वारे परमारला जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत १ लाख २२ हजार रुपये दिले.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने एका व्यक्‍तीस दिलेला चेक न वटल्याने त्यांनी बँक खात्यातील व्यवहार तपासले असता, १ लाख २२ हजार रुपयांची रक्कम प्रदीप परमारला गेल्याचे लक्षात आले. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने मुलीकडे विचारणा केल्यानंतर, तिने परमारला पैसे दिल्‍याचे सांगितले. मात्र मागणी करूनही परमारने पैसे न दिल्‍याने बांधकाम व्यावसायिकाने नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी परमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81782 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top