
भिवंडीत ८९४ धोकादायक इमारती.
भिवंडी, ता. १० (बातमीदार) ः भिवंडी पालिका हद्दीत ८९४ इमारती धोकादायक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी धोकादायक इमारतींची संख्या १,२४३ इतकी होती. ती या वर्षी कमी झाली. मात्र धोकादायक इमारतींची संख्या कमी कशी झाली, किती इमारती दुरुस्त झाल्या, किती इमारती निष्कासित केल्या याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार अतिधोकादायक राहण्यास अयोग्य, तत्काळ निष्कासित (सी -१), इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे (सी -२ अ), इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती (सी - २ ब) व इमारतीची किरकोळ दुरुस्ती (सी - ३) अशी वर्गवारी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची करण्यात येते. भिवंडी पालिका क्षेत्रात सी - १ मध्ये ३४६, सी - २ अ मध्ये ३३२, सी - २ ब मध्ये १९१ तर सी - ३ मध्ये २५ इमारतींचा समावेश आहे. सर्वाधिक धोकादायक इमारती प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये आहे. या प्रभागात ३६१ इमारती धोकादायक आहेत.
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमरतींचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही पालिका धोकादायक इमारतींबाबत गंभीर नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दिवानशाह आजमी नगर येथे एक मजली घरांच्या काही भागांची पडझड झाली; तर आजाझ नगर येथे एका घराचा भाग कोसळून झाली होती. या दुर्घटनांमध्ये दोन जणांना जीव गमावला होता. त्यानंतर अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले होते. मात्र, काही प्रभाग अधिकाऱ्यानी मोठ्या प्रमाणात अर्थकारण केल्यामुळे अनधिकृत व धोकादायक इमारतींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अनधिकृत व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे डोक्यावर टांगती तलवार आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
प्रभाग समिती सी -१ सी - २ अ सी - २ ब सी - ३
१ २५ १३ --- २४
२ १४ ५५ ९५ ---
३ २१० ११९ ३१ ०१
४ ०७३ १११ ६३ ---
५ ०२५ ३४ ०२ ---
एकूण ३४६ ३३२ १९१ २५
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81789 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..