नावीकांच्या हॉस्टेलसाठी मुंबई पोर्टतर्फे सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नावीकांच्या हॉस्टेलसाठी मुंबई पोर्टतर्फे सहकार्य
नावीकांच्या हॉस्टेलसाठी मुंबई पोर्टतर्फे सहकार्य

नावीकांच्या हॉस्टेलसाठी मुंबई पोर्टतर्फे सहकार्य

sakal_logo
By

शिवडी, ता. १० (बातमीदार) ः कोरोनासंकट काळातदेखील नावीक कामगारांनी काम करून देशसेवा बजावली. नावीक कामगारांच्या हॉस्टेलसाठी मुंबई पोर्टतर्फे सहकार्य केले जाईल, नावीकांसाठी नुसी या कामगार संघटनेमार्फत कामगार व कुटुंबीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना आमलात आणल्या आहेत. आतापर्यंत इतर ठिकाणी मी अशा प्रकारच्या योजना पाहिल्या नाहीत, असे उद्‍गार मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा यांनी जाहीर सभेत काढले.
नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.९) मे रोजी मस्जिद बंदर येथील इंडियन सैलोरस होम सोसायटी येथे ‘नुसीचे संस्थापक मोहम्मद इब्राहिम सेरंग दिन’ नुसीचे अध्यक्ष हिरानंदानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजीव जलोटा बोलत होते.
दरम्यान, नाविक कामगारांच्या ऐतिहासिक लढ्याच्या छायाचित्रीत आठवणींना संग्रहालयामार्फत उजाळा देण्यात आला. करमणुकीसाठी ओमकार मेलडीज वाद्यवृंद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जनरल शिपिंग डायरेक्टर अमिताभ कुमार, नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार अब्दुल गणी सेरंग, कॅप्टन राकेश सिंग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे गंगोपाध्याय, मासाचे मनीष प्रधान, कॅप्टन जयकुमार उपस्थित होते. तर नुसीचे पदाधिकारी मिलिंद कांदळगावकर, सुरेश सोलंकी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81790 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top