‘आठवणींचं पिंपळपान’चे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आठवणींचं पिंपळपान’चे प्रकाशन
‘आठवणींचं पिंपळपान’चे प्रकाशन

‘आठवणींचं पिंपळपान’चे प्रकाशन

sakal_logo
By

‘आठवणींचं पिंपळपान’चे प्रकाशन

मुंबई, ता. १० : राजश्री बने यांनी लिहिलेल्या ‘आठवणींचं पिंपळपान’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पद्मश्री वामन केंद्रे यांच्या हस्ते पार पडले. दक्षिण मुंबईतील ‘रूपरंग डोंगरी’ संस्थेच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या संस्थेच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त शिवाजी मंदिराच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभाला पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम, पद्मश्री अनुप जलोटा, डॉ. अरुण सावंत, माजी सहायक पोलिस आयुक्त अ‍ॅड. धनंजय वंजारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘हे पुस्तक म्हणजे कथा, कादंबरी नसून एका संस्थेचा ५० वर्षांचा सामाजिक, सांस्कृतिक आलेख आहे. भविष्यात या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना, कार्यकर्त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे,’ अशा भावना लेखिका राजश्री बने यांनी व्यक्त केल्या. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ‘रूपरंग’चे अध्यक्ष विनायक राणे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81799 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top