उरण शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरण शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरवात
उरण शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरवात

उरण शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरवात

sakal_logo
By

उरण, ता. १० (वार्ताहर) : नगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात केली आहे. शहरातील दादर, कुंभारवाडा, कामठा, भिवंडीवाला या मुख्य नाल्यांची सफाई ठेकेदारांमार्फत केली जात आहे.

दरवर्षी उरण नगरपालिका मे अखेर मान्सूनपूर्व नाले सफाई करण्याची कामे करत असते. मात्र मागील वर्षी मे महिन्यात चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याने नाले सफाईला विलंब लागला होता. यावर्षी चक्रीवादळाचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी लवकरच नालेसफाई करण्याचा निर्णय घेऊन नाले साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

द्रोणागिरी डोंगराकडून येणारे पाणी मुख्य नाल्याकडून तो थेट कोळीवाडा मार्गे समुद्रात जाते. त्यामुळे त्या नाल्याची सफाई ही प्रथम केली जात आहे. शहरातील गटारामध्ये कचरा, प्लास्टिक असल्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबली जातात. पाणी निचरा होत नसल्यामुळे पूरस्थिती निर्माण होत असते. नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरवात करण्यात आली आहे.

आम्ही स्वच्छतेवर जास्त भर देत आहोत. बाजार बंद झाल्यानंतर शहरातील स्वच्छता रात्रीच्या वेळी केली जाते. त्यामुळे कोठेही रस्त्यावर कचरा दिसून येत नाही.
- संतोष माळी, मुख्याधिकारी, उरण नगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81806 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top