ॲनिमिया रुग्णांत भारत जगात आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲनिमिया रुग्णांत भारत जगात आघाडीवर
ॲनिमिया रुग्णांत भारत जगात आघाडीवर

ॲनिमिया रुग्णांत भारत जगात आघाडीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : जगातील ॲनिमियाचे सर्वाधिक रुग्ण भारतात असून देशातील जवळपास ५८ टक्के गर्भवती महिला ॲनिमियाने पीडित आहेत. त्यातही भारतातील २० ते ४० टक्के मातामृत्यूचे मूळ कारण ॲनिमिया असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञांची नुकतीच बैठक पार पडली. त्यात ॲनिमियाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

दक्षिण आशियातील ॲनिमियामुळे होणाऱ्या माता मृत्यूंमध्ये ८० टक्के वाटा भारताचा आहे. न्यूट्रिशनल ॲनिमिया ही भारतातील एक प्रमुख आरोग्य समस्या आहे आणि ती प्रामुख्याने लोहाच्या कमतरतेमुळे आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-३ च्या अहवालानुसार, देशातील सर्व वयोगटांमध्ये ॲनिमियाचे रुग्ण आढळत असल्याचे निदर्शनास आले.
---
देशातील ॲनिमिया रुग्णांचे प्रमाण
गर्भवती महिला - ५८ टक्के
गर्भवती नसलेल्या महिला - ५० टक्के
किशोरवयीन मुली (१५ ते १९ वर्षे) - ५६ टक्के
तीन वर्षांखालील मुले - ८० टक्के
---
देशातील ॲनिमिया रुग्णांच्या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे आहारातील लोहाची कमतरता. त्यामुळे ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘वर्ल्ड काँग्रेस ऑफ ॲॅनिमिया’ हा महत्त्वाचा उपक्रम जागतिक पातळीवर हाती घेण्यात आला आहे.
- डॉ. निरंजन चव्हाण, अध्यक्ष, मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग संस्था
---

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81808 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top