खुपरी ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंचाच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुपरी ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंचाच्या हाती
खुपरी ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंचाच्या हाती

खुपरी ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंचाच्या हाती

sakal_logo
By

वाडा, ता. ११ (बातमीदार) ः तालुक्यातील श्रीमंत म्हणून समजल्या जाणाऱ्या खुपरी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच प्रारब्धा तांडेल यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना पदावरून हटविण्यात आले. आता रिक्त झालेल्या सरपंच पदाचा प्रभारी कार्यभार उपसरपंच वैशाली लकडे यांच्याकडे देण्यात आला आहे. तसे आदेश वाड्याच्या गटविकास अधिकारी यांनी काढले आहेत.
खुपरी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच प्रारब्धा प्रकाश तांडेल यांनी नियमबाह्य खर्च, मासिक सभा न घेता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी सरपंच पदावरून, तसेच पंचायतीच्या सदस्य पदावरून हटवले. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले होते. सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टिकोनातून उपसरपंच वैशाली योगेश लकडे यांना पुढील सरपंचपदाची निवडणूक होईपर्यंत सरपंचपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे आदेश वाड्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ यांनी दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81814 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top