‘नानावटी’च्या नव्या इमारतीत जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नानावटी’च्या नव्या इमारतीत जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान
‘नानावटी’च्या नव्या इमारतीत जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान

‘नानावटी’च्या नव्या इमारतीत जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : मुंबईतील डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाचा विस्तार करण्यात येणार असून नव्या इमारतीत जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. पश्चिम भारतातील एक सर्वात मोठे रुग्णालय उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने सध्याची ३५० खाटांची क्षमता २०२४ पर्यंत ६०० पेक्षा जास्त वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. सोमवारी (ता. ९) रुग्णालयाच्या परिसरात नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.

नव्या विस्तार योजनेमुळे रुग्णालयाची क्षमता ६०० पेक्षा जास्त खाटांपर्यंत वाढेल. योजना पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयात ९५० पेक्षा जास्त आधुनिक खाटा असतील. नवीन इमारत २०२४ पर्यंत पूर्ण होऊन सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. विस्तारानंतर ‘नानावटी’ पश्चिम भारतातील सर्वात मोठ्या खासगी रुग्णालयांपैकी एक म्हणून गणले जाईल. रुग्णालयाच्या विस्तारासाठी एकूण ७०० कोटींची गुंतवणूक केली जाईल. पाच हजारपेक्षा जास्त डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल.

वंचित समुदायांतील रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात म्हणून २० टक्के खाटा राखीव ठेवल्या जातील. त्यामुळे रुग्णालयाच्या नव्या संकुलात आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गांतील रुग्णांसाठी १८० खाटांची सुविधा उपलब्ध होईल. ७० पेक्षा जास्त वर्षांपासून ३५० पेक्षा जास्त खाटांच्या सुविधांसह नानावटी रुग्णालय आरोग्यसेवा देत आहे. सध्या रुग्णालयात १५०० पेक्षा जास्त डॉक्टर, परिचारिका आणि इतर पूर्णकालीन कर्मचारी काम करतात.

गरजू कुटुंबांना निःशुल्क उपचार
मॅक्स हेल्थकेअर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अभय सोई म्हणाले, की विस्तार योजनेमुळे आम्ही मुंबईबरोबरीनेच महाराष्ट्रातील इतर भागांमधील रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा प्रदान करू शकू. जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. रुग्णालयाची नवी इमारत पूर्णपणे सुरू झाल्यानंतर हजारो गरजू कुटुंबांना निःशुल्क उपचार देता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81817 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top