सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुर्दशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुर्दशा
सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुर्दशा

सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुर्दशा

sakal_logo
By

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीवर मिरा-भाईंदर पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत असतानाही त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी या विषयाला वाचा फोडली.
शहरातील २०१ सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या ठेकेदाराला वार्षिक सहा कोटी रुपये दिले जात आहेत; मात्र त्यानंतरही स्वच्छतागृहांची देखभाल ठेकेदाराकडून केली जात नाही. या ठेकेदाराशी करार करून त्यात अटी शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. मात्र, या अटी-शर्तींचे उल्लंघन केले जात आहे. अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले आहेत, नळ चोरीला गेले आहेत, स्वच्छतागृहांसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार बँक खात्यात वेतन दिले जात नाही, काही स्वच्छतागृहात कर्मचारीच उपस्थित राहत नसून ते अन्य ठिकाणी कामाला जातात आदी मुद्दे अनिल सावंत यांनी सभागृहात उपस्थित केले.
ठेकेदारासोबत महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांचीही स्वछतागृहांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहेत; मात्र पालिकेचे स्वच्छता निरीक्षकांकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सावंत यांनी या वेळी केला. त्यानंतर या विषयावर सर्वच सदस्य आक्रमक झाले आणि शहरातील स्वछतागृहांची स्वच्छता होत नसून नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतागृहाच्या टाकीत पडून मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी या वेळी केली.

प्रशासनाकडून स्वच्छतागृहांची वेळोवेळी पाहणी केली जाते. मात्र, स्वच्छतागृहांची दुरुस्ती केल्यानंतर दरवाजे, नळ यांची चोरी केली जाते. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन स्वच्छतागृहांची निरीक्षक आणि अभियंत्यांकडून येत्या पंधरा दिवसांत पुन्हा एकदा पाहणी केली जाईल आणि ठेकेदार दोषी असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा-भाईंदर पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81820 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top