वंकास येथे सामुदायिक विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंकास येथे सामुदायिक विवाह सोहळा
वंकास येथे सामुदायिक विवाह सोहळा

वंकास येथे सामुदायिक विवाह सोहळा

sakal_logo
By

कासा, ता. १० (बातमीदार) ः रोशनी फाऊंडेशन आणि चॕरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने डहाणूतील वंकास येथे आदिवासी समाजातील २५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. डहाणूचे आमदार विनोद निकोले हे वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी हजर होते. सोहळ्याच्या वेळी नवविवाहित जोडप्यांना ट्रस्टकडून संसारोपयोगी भांडी, कपडे, पंखा, जीवनावश्यक साहित्य देण्यात आले; तर प्रकल्प कार्यालय डहाणू यांच्याकडून कागदपत्रांचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर १० हजार रुपयांची भेट नवदाम्पत्यांना देण्यात येणार आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी ट्रस्टच्या अध्यक्षा गीता व संजीव मृच्छाला, राजू वावरे यांनी मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81822 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top