१८ लाखांचे मोबाईल चोरणार तरुण जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१८ लाखांचे मोबाईल चोरणार तरुण जेरबंद
१८ लाखांचे मोबाईल चोरणार तरुण जेरबंद

१८ लाखांचे मोबाईल चोरणार तरुण जेरबंद

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) ः छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले मोबाईल दुकान फोडून त्यातील तब्बल १८ लाख ७२ हजार रुपयांचे मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. कर्तव्यदक्ष बिट मार्शलमुळे या चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटक केलेल्या आरोपीचे नाव महम्मद फिरोज नईम अहमद खान ऊर्फ मोनू असे आहे.
बिट मार्शल, पोलिस नाईक अशोक मोरे व पोलिस शिपाई राजेंद्र कोंगे हे उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातील संजय गांधी नगर भागात गस्तीवर असताना मोनू त्यांना संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या हातातील पिशवीत असंख्य मोबाईल आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले.

मौजमजेसाठी चोरी
आरोपी मोनू हा अंबरनाथमधील नॅनो सिटी या उच्चभ्रू सोसायटीत राहतो. यापूर्वी त्याने अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ लाखांचे मोबाईल लंपास केले होते. मोबाईल विकून आलेल्या पैसे तो मौजमजेसाठी वापरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याची बाजारपेठेतून धिंड काढली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81826 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top