घामाच्या धारांमुळे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घामाच्या धारांमुळे आरोग्य धोक्यात
घामाच्या धारांमुळे आरोग्य धोक्यात

घामाच्या धारांमुळे आरोग्य धोक्यात

sakal_logo
By

वाशी, ता. ११ (बातमीदार) : मे महिन्यात तापमानाचा पारा ३५ अंशांच्या खाली उतरलेला नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. दुपारच्या उन्हात फिरताना नवी मुंबईकर घामाघूम होत आहेत. त्यामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास नागरिकांना होत आहेत. सायंकाळी आणि रात्रीदेखील हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा नवी मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे.

ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढल्याचे डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले. दुपारी उन्हात फिरताना डोके झाकून घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबू, साखरपाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते. उन्हाळ्यात थंड पेय, आईसक्रीम, बर्फाचा गोळा अशा पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमुळे तात्पुरते बरे वाटते; पण याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. अतिथंड पदार्थ खाल्ल्यामुळे घसा बसणे, खोकला होणे असेही त्रास होत आहेत. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी, पोट बिघडण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तहान जास्त लागली असली तरीही पाणी पिताना काळजी घ्यायला हवी. घरातले स्वच्छ पाणी प्यावे, असा सल्ला डॉ. विनायक पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81827 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top