
अंबरनाथमध्ये ५९ वर्षीय इसमाची आत्महत्या
अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) ः लोकनगरी रस्त्यालगतच्या झाडीमध्ये बेपत्ता असलेल्या हैबत डफळे (५९) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. डफळे यांनी इथल्या एका झाडाला गळफास घेतला होता. मात्र, त्यांचा मृतदेह कुजल्याने तो झाडावरून खाली पडला होता. याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. हैबत डफळे यांनी आत्महत्या का केली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हैबत डफळे आयटीआय कॉलनी परिसरातील तानाजीनगर येथे वास्तव्याला होते. वसईच्या एका कंपनीत डफळे काम करत होते. बुधवारी (ता. ४) ते कामावर गेले होते. मात्र तेव्हापासून ते घरी आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी वसईच्या पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81828 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..