कामा रुग्णालयात एक सखी थांबा केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामा रुग्णालयात 
एक सखी थांबा केंद्र
कामा रुग्णालयात एक सखी थांबा केंद्र

कामा रुग्णालयात एक सखी थांबा केंद्र

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : खास महिलांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात एक सखी थांबा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईतील महिलांना एका छताखाली सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार गरजू महिलांना कामा रुग्णालयात निवारा, वैद्यकीय उपचार, मानसिक समुपदेशन, कायदेविषयक सल्ला आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सध्या मुंबईत केईएम आणि उपनगरीय रुग्णालयांपैकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये वन स्टॉप सेंटर म्हणजेच एक सखी थांबा केंद्र सुरू आहे.
केईएम रुग्णालयात २०१८ मध्ये एक सखी थांबा केंद्र सुरू झाले; पण तेथील खाटांची संख्या मर्यादित असल्याने कामा रुग्णालयात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार कामा रुग्णालयातील केंद्रासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
---
काय आहे एक सखी थांबा केंद्र?
शहरातील गरजू महिलांना निवारा, मेडिकल उपचारांसाठी, मानसिक गरजेनुसार समुपदेशन, कायद्याची गरज अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षात मुंबईत एकूण ५११ महिलांची या केंद्रासाठी नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ३०७ महिलांना कायदेविषयक, १७५ महिलांना वैद्यकीय मदत, ९० महिलांना पोलिस सहाय्य, ५११ जणांना समुपदेशन, तात्पुरता निवारा ५०, तर ४३ महिलांना इतर सेवा देण्यात आली. घरगुती हिंसाचार, बालविवाह, बेपत्ता आदी प्रकरणातील महिलांचे या केंद्राच्या माध्यमातून पुनर्वसन केले जातात, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.
-----
भारतात एकूण १५० एक सखी थांबा केंद्र सुरू करण्याची योजना आहे. कामा रुग्णालयातील केंद्रात आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या महिलेला रुग्णालयात उपचारासोबतच पुनर्वसनही करणे शक्य होईल. १५ जणांच्या समिती सदस्यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे. लवकरच केंद्राचे काम सुरू होईल.
- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81831 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top