अपना बाजारच्या शोभायात्रेचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपना बाजारच्या शोभायात्रेचा प्रतिसाद
अपना बाजारच्या शोभायात्रेचा प्रतिसाद

अपना बाजारच्या शोभायात्रेचा प्रतिसाद

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १० (बातमीदार) : अपना बाजार या सहकारी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ झाला असून त्यानिमित्ताने नायगाव-दादर परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शोभायात्रेत रथ सजवण्यात आला होता. या रथात अपना बाजार संस्थेला आतापर्यंत मिळालेली सन्मानचिन्हे ठेवण्यात आली होती. ढोलताशाच्या गजरात सर्वांनी एकसारखा असा पारंपरिक पेहराव करून नायगाव, भोईवाडा, वडाळा टेलिफोन एक्स्चेंज परिसरातून ही शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी खासदार अरविंद सावंत, आमदार कालिदास कोळंबकर, अपना बँकेचे अध्यक्ष अविनाश सरफरे, उपाध्यक्ष शांताराम दिवेकर आणि बँकेचे संचालक मंडळ, माजी आमदार अतुल शाह, स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारिख उपस्थित होते.
कार्याध्यक्ष श्रीपाद फाटक यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा काढण्यात आली. यात उपकार्याध्यक्ष अनिल गंगर, कार्यकारी समिती सदस्य संतोष सरफरे, विश्वनाथ मलुष्टे, संध्या कवळी, अश्विन उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. काजळे तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच त्यानंतर समारोपाचा भव्य सोहळा होईल, अशी माहिती संस्थेच्या वतीने या वेळी देण्यात आली. मुंबईतील नायगाव परिसरात ९ मे १९४८ रोजी नायगाव कामगार ग्राहक सहकारी मंडळ लिमिटेडच्या अपना बाजार या एका लहानशा विक्रीदालनास दादासाहेब सरफरे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सुरुवात केली. १९६८ मध्ये त्याचे नायगाव विभागात पहिले डिपार्टमेंट स्टोअर्स सुरू केले. मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातही संस्थेने आपले पाय रोवले. गोवा व गुजरात या ठिकाणीही संस्थेची विक्रीदालने सुरू करण्यात आली. आतापर्यंत अपना बाजारला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81833 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top