महादेव गायकर यांना रयत सेवक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महादेव गायकर यांना रयत सेवक पुरस्कार
महादेव गायकर यांना रयत सेवक पुरस्कार

महादेव गायकर यांना रयत सेवक पुरस्कार

sakal_logo
By

पनवेल, ता. १० (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्यामार्फत माजी प्राचार्य एन. आर. माने निष्ठावंत गुणी रयत सेवक पुरस्कार २०२२ हा परशुराम म्हात्रे विद्यालय, नावडेचे शिपाई महादेव नारायण गायकर यांना रविवारी (ता. ८) प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्या हस्ते व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या वेळी संस्थेचे सचिव प्राचार्य विठ्ठलराव शिवणकर व सहसचिव संजय नागपुरे, मध्य विभाग विभागीय अध्यक्ष महादेव मोहिते, रायगड विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर व सहायक विभागीय अधिकारी एस. एस. फडतरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81834 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top