सावत्र आईची हत्या करणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावत्र आईची हत्या करणारा अटकेत
सावत्र आईची हत्या करणारा अटकेत

सावत्र आईची हत्या करणारा अटकेत

sakal_logo
By

ठाणे, ता. ११ : वडील दुबईवरून आल्यावर सावत्र आईला घेऊन ते गावी जाणार होते. त्यातच ते सर्व प्रॉपर्टी सावत्र आईच्या नावे करतील या संशयातून तिच्याशी भांडण करून तिच्या पोटात चाकू भोसकून ठार मारणाऱ्या मुलाला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान कय्यम खान (२५) असे या हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. इम्रानला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरात येथून ताब्यात घेत, मंगळवारी (ता. १०) त्याला मुंब्रा पोलिसांच्या हवाली केले.
इम्रान हा आईसोबत नालासोपारा येथे राहतो; तर त्याची मृत सावत्र आई शहनाज बानु कय्यम खान (५२) या मुंब्रा येथे राहत असून वडील कामानिमित्त दुबईत असतात. इम्रानचे वडील दुबईहून आल्यानंतर ते सावत्र आईला घेऊन बुलढाणा येथील गावी जाणार होते. याची कुणकुण इम्रानच्या कानावर आली होती. त्यामुळे तो हत्येच्या घटनेच्या दोन दिवस आधीच त्याच्या मुंब्र्यात राहणाऱ्या बहिणीकडे आला होता. याचदरम्यान ३ मे रोजी त्याने सावत्र आईच्या पोटात चाकू भोसकून तिला जखमी केले आणि तेथून तो पसार झाला. शहनाज बानू खान यांचा ५ मे रोजी मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास मुंब्रा पोलिसांसह गुन्हे शाखा समांतरपणे करत होते. इम्रान गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी गुजरातमधील मोडासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ९ मे रोजी ताब्यात घेतले. ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ चे वरिष्ठ निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक निरीक्षक नीलेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81837 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top