पोलिस पाटील गावातील पहारेकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस पाटील गावातील पहारेकरी
पोलिस पाटील गावातील पहारेकरी

पोलिस पाटील गावातील पहारेकरी

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : पोलिस पाटील हे खऱ्या अर्थाने त्या गावाचे पहारेकरी असतात. त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे आहे. गावात काय चालले आहे, याची माहिती वेळोवेळी घेऊन काही गोष्टी समाज विघातक असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी, असे आवाहन परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सोमवारी (ता. १०) केले. ते पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंथन सभागृह येथे घेतलेल्या पोलिस पाटलांच्या बैठकीत बोलत होते.

पोलिस पाटलांनी सामाजिक भान ठेऊन काम करावे. गावात वातावरण बिघडवणाऱ्या घटना घडत असतील तर त्याची माहिती त्वरित द्यावी. सामाजिक तेढ निर्माण करणारे बॅनर, तसेच कोणतीही परवानगी नसताना पुतळे किंवा धार्मिक स्थळे अनेक जण उभारतात, त्या संदर्भात तत्काळ माहिती द्यावी. गावातील चोहोबाजूला सीसी टीव्ही लावण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत, असे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्त भागवत सोनावणे, तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोलिस निरीक्षक अंकुश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, गोपनीय विभागाचे सचिन होळकर यांच्यासह तालुका हद्दीतील ३२ पोलिस पाटील उपस्थित होते.

जनावरे चोरीचे प्रमाण वाढले
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौडकर यांनी सांगतिले की, गाव पातळीवर जनावरे चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शाळा परिसरात अवैध धंदे नको
कोणत्याही अवैध गोष्टी होत असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिस ठाण्यात द्यावी. त्यामध्ये प्रामुख्याने शाळा, महाविद्यालय परिसरातील बेकायदेशीर गुटखा विक्री, मद्यविक्री, अमली पदार्थांची विक्री होत असल्यास तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. तरी अशा प्रकारच्या कृत्यांना वाव देऊ नये.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81838 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top