सामान्य करत १० टक्के सुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामान्य करत १० टक्के सुट
सामान्य करत १० टक्के सुट

सामान्य करत १० टक्के सुट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : महापालिकेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तांवरचा सामान्य कर माफ केला आहे. तसेच ५०० चौरस फुटांवरील मालमत्ता करदात्यांनी कर लवकरात लवकर भरावा, यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार करदात्यांनी मालमत्ता कर १५ जूनपर्यंत भरल्यास सामान्य करात १० टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातील सामान्य कर माफ करण्यात आल्याने मालमत्ता कर बिले वितरण करण्यासाठी उशीर झाला होता. येत्या दोन दिवसांत याचे नियोजन आखले जाणार असून पुढील आठवड्यापासून बिलांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाने दिली. आता मालमत्ता कराची वसुली निर्धारित वेळेत व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकालात पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत, दुसऱ्या सहामाहीचा कर अशी संपूर्ण रक्कम भरल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात सूट देण्यात येणार आहे. त्यानुसार १५ जूनपर्यंत रक्कम भरल्यास १० टक्के सुट दिली जाणार आहे; तर १६ जून ते ३० जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास ४ टक्के, १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत भरल्यास ३ टक्के आणि १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत भरल्यास २ टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81839 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top