आदिवासींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न सुरू ः पाडवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न सुरू ः पाडवी
आदिवासींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न सुरू ः पाडवी

आदिवासींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न सुरू ः पाडवी

sakal_logo
By

पालघर, ता. १० (बातमीदार) ः आदिवासींचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी आदिवासी समाज संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिले. सोमवारी (ता. ९) मंत्री पाडवी पालघरच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी सल्लागार मंडळाची बैठक झालेली नाही. या मे महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी माहिती पाडवी यांनी दिली. आदिवासी समाजाचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी विद्यार्थीदशेपासून अभ्यासाची आवड व गोडी निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास योजना आखण्यात येत आहेत. येत्या काळात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन आदिवासींना दर्जेदार शिक्षण व अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस मंत्र्यांनी व्यक्त केला.

नागालँड, मिझोराम व जवळच्या राज्यातून मोठ्या संख्येने सनदी अधिकारी तयार होतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आदिवासींमधून सनदी अधिकारी तयार व्हावेत, यासाठी आदिवासी विकास विभाग सर्व तो प्रयत्न करील, असे आश्वासन पाडवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. पालघर जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी कार्यालयात आदिवासींच्या विकासासाठी पूर्णवेळ सनदी अधिकारी नेमावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. या वेळी आदिवासी विकास खात्यांतर्गत संबंधित सर्व अधिकारी, खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, काँग्रेसचे सहसंपर्कप्रमुख यशवंत सिंग ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81842 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top