झाडे कोसळल्याने रिक्षाचा चक्काचूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडे कोसळल्याने रिक्षाचा चक्काचूर
झाडे कोसळल्याने रिक्षाचा चक्काचूर

झाडे कोसळल्याने रिक्षाचा चक्काचूर

sakal_logo
By

बदलापूर, ता. १० : बदलापूर पूर्वेकडील जुन्या मासळी बाजाराच्या आवारात वाहनांवर तीन झाडे कोसळल्याची घटना मंगळवारी (ता. १०) घडली. झाडे कोसळल्यामुळे रिक्षासह अनेक दुचाकींचा चक्काचूर झाला. झाड पडत असल्याचा आवाज आल्याने घटनास्थळावरील रिक्षाचालक व इतर नागरिकांनी प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला.

जुन्या मासळी बाजाराला लागून रेल्वेची संरक्षक भिंत आहे. या भिंतीपलीकडील रेल्वे हद्दीतील एक भले मोठे झाड भिंत तोडून बाजाराच्या आवारात पडले. हे झाड पडत असताना शेजारील एक झाड व बाजारात पालिका हद्दीतील एक झाड अशी तीन झाडे एकत्र कोसळली. या वेळी झाड पडत असल्याचे लक्षात येताच रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखून रिक्षातील आजारी असलेल्या प्रवाशाला बाहेर काढले. तसेच, स्वतःचेही प्राण वाचवले. या वेळी रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. आजुबाजूला थांबलेल्या दुचाकींवरदेखील झाडे पडली. तसेच इथे असलेल्या विजेच्या तारांवरसुद्धा झाडे पडल्याने तारा तुटल्या.

घटना लक्षात येताच परिसरातील दुकान व्यावसायिकांनी अग्निशमन दल, पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासनाला पाचारण केले; मात्र या वेळी अग्निशमन दल उशिरा पोहचल्याची तक्रार व्यावसायिक दिलीप पवार यांनी केली. सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक प्रशासन झाडे हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
----
अनेकदा आम्ही रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाला मुळांपासून कमकुवत व अवाजवी वाढलेली झाडे छाटून टाकायला सांगितले होते; मात्र ढिम्म प्रशासनाने यात अजिबात लक्ष दिले नाही. आज जर या दुर्घटनेमुळे जीवितहानी झाली असती, तर याला जबाबदार कोण होते?
- दिलीप पवार, व्यावसायिक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81850 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top