भाजपची महापालिकेच्या कारभारावर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपची महापालिकेच्या कारभारावर टीका
भाजपची महापालिकेच्या कारभारावर टीका

भाजपची महापालिकेच्या कारभारावर टीका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः २७ गावातील पाणीटंचाईमुळे देसलेपाडा येथील ५ जणांचा हकनाक जीव गेला; पण पालिका अधिकारी मात्र नाच-गाण्यात धुंद आहेत. मलमपट्टी करण्याऐवजी महापालिका मीठ चोळत आहे, अशी टीका भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली. ढिसाळ नियोजनासाठी पालिकेची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे, असेही ते म्हणाले.

गावातील कृत्रिम पाणीटंचाईच्या विरोधात मागील महिन्यात मनसे आणि भाजपने मोर्चा काढला होता. त्यात दोन्ही पक्षाचे आमदार सहभागी झाले होते. आता तीन दिवसांपूर्वी ही देसलेपाडा येथील ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना आखणे आवश्यक होते; पण महापालिका जखमेवर मीठ चोळत आहे, असे भोईर म्हणाले. या कृत्रिम पाणीटंचाईवर महापालिकेने ठरवले निश्चित मार्ग निघेल आणि लवकरात लवकर या भागात पाणी मिळेल. खरे तर मोर्चाच्या वेळेला जी आश्वासने दिली, त्या पद्धतीने कृती केली असती, तर पाण्यापायी जे पाच जणांचे बळी गेले, ते गेले नसते, असे भोईर म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81851 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top