राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण

sakal_logo
By

पनवेल, ता. १० (प्रतिनिधी) : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत डॉ. अविनाश जाधव यांनी क्षयरोगाची लक्षणे, तपासणी, चाचणी, उपचार पद्धती याची माहिती दिली. तसेच क्षयरोग उच्चाटनासाठी सरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. योग्य तपासण्या, लवकर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास क्षयरोग बरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महापालिकचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनील नखाते, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पंडित, डॉ. बर्फे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81852 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top