
विक्रम बनसोडे यांना पोलिस महासंचालकांचे पदक
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : सन २०२१ या वर्षात उल्लेखनीय सेवेबद्दल विक्रोळीतील पार्कसाईट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांना पोलिस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहीर झाले आहे. विक्रम बनसोडे हे २००४ मध्ये एमपीएससी स्पर्धा परीक्षा देऊन ते पोलिस उपनिरीक्षक झाले. त्यानंतर सर्वप्रथम त्यांची मुंबईतील यलो गेट पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी घाटकोपर पोलिस ठाणे, नवी मुंबईतील रबाळे, कोपरखैरणे, क्राईम ब्रँच, मुंबईतील सुरक्षा शाखेत काम केले आहे. सध्या ते विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून ते आपले कर्तव्य बजावत आहेत. बनसोडे हे नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यामुळे त्यांना आतापर्यंत १९४ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कार्यातसुद्धा पुढाकार घेतला असून कोरोनाच्या संकटकाळात बनसोडे यांनी विक्रोळीतील डोंगराळ भागात राहणाऱ्या अनेक गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात देत त्यांना अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवून देण्याचे कार्य केले आहे. पार्कसाईट पोलिस ठाण्यातदेखील त्यांनी विविध प्रकारचे गुन्हे हाताळून अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81855 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..