कल्याणमध्ये गटारे साफसफाईला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये गटारे साफसफाईला सुरुवात
कल्याणमध्ये गटारे साफसफाईला सुरुवात

कल्याणमध्ये गटारे साफसफाईला सुरुवात

sakal_logo
By

कल्याण, ता. १० (बातमीदार) ः पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात छोटे नाले, गटारे यामध्ये पाणी तुंबून रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. ही गैरसोय टळावी, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागाच्या सहायक आयुक्तांना त्यांच्या प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून प्रभागातील छोटे नाले, गटारे यांची वेळोवेळी साफसफाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज (ता. १०) सफाईला सुरुवात करण्यात आली आहे.

प्रभागस्तरावर छोटी गटारे साफ करण्याचे या वर्षी पालिकेने ठरविले आहे. आज क प्रभागाचे सहायक आयुक्त सुधीर मोकल यांनी स्वच्छता अधिकारी योगेश जगताप, आरोग्य निरीक्षक जगन्नाथ वड्डे, दत्ताराम सावंत व भिमदास यांच्या पथकासह कल्याण स्थानक परिसरातील व शिंदे मळा येथील गटार व चेंबर्समधील गाळ काढून साफ केला. तसेच, जयभीम नगर, बिर्ला कॉलेज परिसरातील गटारांमधील गाळ काढून साफ करण्याची कार्यवाही करण्यात आली.

कल्याण पश्चिममधील विकास हॉटेल ते रुक्मिणीबाई रुग्णालय, महात्मा फुले चौकातील गटारे, सांगळे वाडी, चौधरी मोहल्ला, घेलादेवजी चौक, वल्लीपीर रोड ते कृष्णा टॉकीज,मल्हार नगर, गणेश कृपा चाळ ते दीपलक्ष्मी बिल्डिंग या परिसरातील अंतर्गत गटारे साफ करण्यात आली. कल्याण पूर्वमधील ड प्रभागातही प्रभागाच्या सहायक आयुक्त सविता हिले यांनी आरोग्य निरिक्षक तरे, ठाकरे, निकुंभ यांच्या पथकासह ड प्रभाग परिसरातील गटारांमधील चोकअप काढून गटारांची साफसफाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81858 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top