दमण बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दमण बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाई
दमण बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाई

दमण बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाई

sakal_logo
By

मनोर, ता. १० ः उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जव्हार तालुक्यातील खंबाळा जव्हार रस्त्यावरील चालतवड गावच्या हद्दीत मंगळवारी (ता. १० ) दमण बनावटीची दारू तस्करी रोखली आहे. या कारवाईत इको कार, महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला दमण बनावटीचा मद्यसाठा मिळून सात लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारू तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना भरारी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.

दमण बनावटीची दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर जिल्हा भरारी पथकाने जव्हार तालुक्यातील खंबाळा जव्हार रस्त्यावरील चालतवड गावच्या हद्दीत सापळा रचला होता.मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास चालतवड गावच्या हद्दीत संशयास्पद इको कारची तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान इको कारमध्ये ९६ बल्क लिटर दमण बनावटीचे विदेशी मद्य आणि ७२ बल्क लिटर बिअरचा साठा आढळून आला. कारसह सात लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारचालक जयराम काशिनाथ घाटाळ आणि शैलेंद्र सोमा डोके यांना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक डॉ. विठ्ठल भुकन यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर, दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, जवान भाऊसाहेब कराड, प्रशांत निकुंभ यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81861 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top