हिंदू वृद्धाचे मुस्लिम नागरिकांच्या मदतीने अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू वृद्धाचे मुस्लिम नागरिकांच्या मदतीने अंत्यसंस्कार
हिंदू वृद्धाचे मुस्लिम नागरिकांच्या मदतीने अंत्यसंस्कार

हिंदू वृद्धाचे मुस्लिम नागरिकांच्या मदतीने अंत्यसंस्कार

sakal_logo
By

मनोर, ता. १० (बातमीदार) ः बियोंड सिक्टि या वृद्धाश्रमात राहणारे वयोवृद्ध व्यक्ती एकनाथ महादलकर यांचे मंगळवारी (ता.१०) निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनोरच्या मुस्लिम धर्मिय नागरिकांनी साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच, स्मशानभूमीत उपस्थित राहून अंत्यसंस्कारचा विधी पूर्ण करण्यास मदत केली. त्यामुळे महादलकर कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. तसेच, मुस्लिम धर्मिय नागरिकांनी एका हिंदू धर्मिय व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मदत केल्यामुळे परिसरात या कृतीचे कौतुक होत आहे.

टेन ग्रामपंचायत हद्दीतील बियोंड सिक्टि वृद्धाश्रमात एकनाथ महादलकर गेल्या दोन वर्षांपासून राहत होते. मंगळवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एकनाथ महादलकर अविवाहित होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या निकटच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य अशिष महादलकर आणि सहकारी विकास उपाध्याय मुंबईवरून मनोरच्या आश्रमात दाखल झाले. पण, अनोळखी भागात अंत्यसंस्कार कसे पार पाडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांच्या मदतीसाठी मनोरचे समाजसेवक बिलाल रईस, फुरकान खतीब, सिकंदर दळवी, मुबिन दळवी, कमिल दळवी, रयान दळवी आणि युसुफ मेमन पुढे आले. त्यांनी अंत्यसंस्कारासाठी साहित्य उपलब्ध करून दिलेच, पण स्मशानभुमीत उपस्थित राहून विधी पार पाडण्यास मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे महादलकर कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81862 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top