मुंबईत उत्तर भारतीय कार्यालय सुरू करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत उत्तर भारतीय 
कार्यालय सुरू करणार
मुंबईत उत्तर भारतीय कार्यालय सुरू करणार

मुंबईत उत्तर भारतीय कार्यालय सुरू करणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १० ः मुंबईतील विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशातील नागरिक कार्यरत आहेत. व्यवसाय तसेच स्थानिक पातळीवर उत्तर भारतीय लोकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मुंबईत उत्तर भारतीय कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. एखाद्या दूतावासाप्रमाणे हे कार्यालय स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री योगी म्हणाले.
मुंबईत स्थापन होणाऱ्या उत्तर भारतीय कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत माहिती देण्यात येईल. तसेच पर्यटन, लघू उद्योग, मध्यम उद्योग आणि अनेक प्रकारच्या गुंतवणुकीसाठी उत्तर प्रदेशातील संधीची माहिती या कार्यालयातून देण्यात येईल. तसेच उत्तर भारतीय नागरिकांसाठीचा महाराष्ट्र सरकारशी समन्वय घालून देण्यासाठीही हे कार्यालय काम करणार आहे. मुंबई कोरोनाच्या काळात असंघटीत क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. या काळात रोजगारावर गदा आल्याने अनेक उत्तर भारतीय लोकांनी मुंबई सोडणे पसंत केले होते, पण लॉकडाऊन संपताच अनेक लोक मुंबईत परतले.
---
उद्योगवाढीसाठी प्रयत्न
योगी सरकारने उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत उद्योजकांसोबतच्या परिषदांपासून ते मोठ्या जाहिरातीच्या कॅम्पेनमधून यूपीत उद्योग आकर्षित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यातच आता मुंबईत यूपीच्या नागरिकांच्या मदतीसाठी कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81867 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top