आश्रमशाळेत सफाई कामगार तरुणीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्रमशाळेत सफाई कामगार तरुणीवर बलात्कार
आश्रमशाळेत सफाई कामगार तरुणीवर बलात्कार

आश्रमशाळेत सफाई कामगार तरुणीवर बलात्कार

sakal_logo
By

शहापूर, ता. १० (बातमीदार) ः अनुदानित आश्रमशाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एका २४ वर्षीय आदिवासी तरुणीवर त्याच आश्रमशाळेतील पहारेकऱ्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील गांडुळवाड येथे ही घटना घडली. पहारेकरी कृष्णा गोडांबे फरारी झाला असून किन्हवली पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पहारेकऱ्यानेच बलात्कार केल्यामुळे आश्रमशाळेतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गांडुळवाड येथील या आश्रमशाळेला ३० एप्रिलपासून सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे सध्या शाळेत जास्त वर्दळ नव्हती. पीडित तरुणी तलवाडा येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून या आश्रमशाळेत सफाई कामगाराचे काम करीत आहे. सोमवारी रात्री पीडित तरुणीला रात्रपाळी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पीडिता कामावर हजर झाली होती. शाळेत विद्यार्थी नसल्याचा फायदा घेऊन पहारेकऱ्याने तरुणीवर बलात्कार केला. तसेच, आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. आज (ता. १०) सकाळी पीडित तरुणीच्या पोटात दुखू लागल्याने आरोपी तिला शहापुरात खासगी रुग्णालयात घेऊन आला. मात्र, खासगी रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने त्याने तरुणीला आश्रमशाळा संघटनेच्या अध्यक्षांच्या हवाली करून पोबारा केला. पीडितेची स्थिती गंभीर असल्याने तिला ठाणे येथे हलविण्यात आले असल्याचे किन्हवली पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गोडांबेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81869 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top