सोहेल खंडवाणीची दुसऱ्या दिवशीही चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोहेल खंडवाणीची 
दुसऱ्या दिवशीही चौकशी
सोहेल खंडवाणीची दुसऱ्या दिवशीही चौकशी

सोहेल खंडवाणीची दुसऱ्या दिवशीही चौकशी

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी (ता. ९) मुंबई आणि ठाण्यातील विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीनंतर आज दुसऱ्या दिवशीही माहीम दर्गा आणि हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणी यांची चौकशी केली. दाऊद इब्राहीमच्या ‘डी कंपनी’च्या दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवायांसंदर्भात ‘एनआयए’ने सोमवारी केलेल्या छापेमारीतून भक्कम पुरावे गोळा केले. सध्या पुरावे तपासण्याचे काम सुरू असून लवकरच दाऊद इब्राहीमशी संबंध इतर सशयितांची चौकशी होणार असल्याचे ‘एनआयए’कडून सांगण्यात आले.

माहीम दर्गा आणि हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त असलेले सोहेल खंडवाणी आज दुपारी दीड वाजता आणि त्यानंतर पुन्हा चार वाजता दक्षिण मुंबईतील ‘एनआयए’ कार्यालयात काही कागदपत्रांसह दाखल झाले. खंडवाणी यांची दोन सत्रांत चौकशी करण्यात आली. सोमवारीही खंडवाणी यांची एनआयए अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. एनआयए पथकाने सोमवारी भेंडी बाजार, नागपाडा, माहीम, वांद्रे, गोरेगाव, मुंब्रा, सांताक्रूझ आणि बोरिवली या भागांत विविध ठिकाणी धाडी घातल्या होत्या. दाऊद इब्राहीमच्या ‘डी कंपनी’च्या दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवायासंदर्भात हे धाडसत्र होते. डी कंपनीशी संबंधित असलेले आणि दाऊदचे विश्वासू असलेले हाजी अनिस ऊर्फ अनिस इब्राहीम शेख, छोटा शकील, जावेद पटेल ईर्फ जावेद चिकना, इब्राहीम मुश्ताक, अब्दुल रज्जाक मेमन ऊर्फ टायगर मेमन हे ‘एनआयए’च्या रडारवर आहे.
----
२१ जणांना चौकशीला बोलावणार
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांच्याशी संबंधित २१ संशयित सहकाऱ्यांची ओळख एनआयएने पटवली आहे. या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी ‘एनआयए’ने मुंबईत २४ ठिकाणी, तर मिरा-भाईंदर भागातील पाच ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या.
---
धाडसत्रातून महत्त्वाचे पुरावे गोळा
‘एनआयए’ने राबवलेल्या धाडसत्रादरम्यान अनेक भक्कम पुरावे हाती लागल्याचे समजते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मालमत्ता व्यवहारातील गुंतवणुकीसंदर्भातील कागदपत्रे, रोख रक्कम आणि पिस्तूल या धाडीदरम्यान जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81870 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top