भोंदू बाबाकडून मायलेकीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंदू बाबाकडून मायलेकीवर बलात्कार
भोंदू बाबाकडून मायलेकीवर बलात्कार

भोंदू बाबाकडून मायलेकीवर बलात्कार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : भूत-पिशाच्च उतरवण्याच्या बहाण्याने मायलेकींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रामलाल सुखदेव शर्मा ऊर्फ मिस्त्रीबाबा (वय ४७) याला ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दोषी ठरवले. भोंदूबाबाला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१५ मध्ये घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले.

आरोपी रामलाल शर्मा याने ३५ वर्षीय पीडित महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगितले होते. ही बाधा उतरवण्याच्या बहाण्याने त्याने महिला व तिची १४ वर्षीय मुलगी दोघींवर बलात्कार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलिस ठाण्यात आरोपी शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. हा खटला विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या समोर आला. सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपी शर्मा याला १० वर्षे सश्रम करावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त डी. डी. टेळे आणि तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. के. चंदनकर यांनी तपास केला; तर कोर्ट पेहरवी म्हणून पोलिस हवालदार सुनील खैरे यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81871 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top