निवडणूक कार्यालयातर्फे तृतीयपंथीयांसाठी पाठ्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक कार्यालयातर्फे तृतीयपंथीयांसाठी पाठ्यवृत्ती
निवडणूक कार्यालयातर्फे तृतीयपंथीयांसाठी पाठ्यवृत्ती

निवडणूक कार्यालयातर्फे तृतीयपंथीयांसाठी पाठ्यवृत्ती

sakal_logo
By

मालाड, ता. ११ (बातमीदार) ः भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारित कार्यरत असलेले महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यांत विविध प्रयत्न करत आहे. त्यांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करत आहे. एक वर्षे कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे.
ही पाठ्यवृत्ती तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून इच्छुक तृतीयपंथीयांनी १० जून २०२२ पर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. यासंदर्भातील अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा ९९८७७७३८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती श्रीकांत देशपांडे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81878 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top