पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडे पहा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडे पहा!
पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडे पहा!

पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडे पहा!

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ११ ः देसलेपाडा येथील पाणीटंचाईमुळे पाच जणांचा जीव गेला आहे. एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती गेल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावरून आता कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भावुक पत्र पाठविले आहे. आपण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असाल, तुम्हाला ही घटना माहीत नसावी म्हणून हा पत्रप्रपंच, असे ट्विट करीत त्यांनी हे पत्र ट्विट केले आहे. पाण्यापायी जीव गेला हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील, आता त्याच डोळ्यांतून थोडं वास्तवाकडे पाहा, असे भावुक आवाहन पालकमंत्री शिंदे यांना केले आहे.
ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. यावरून आता आमदार पाटील यांनी थेट पालकमंत्र्यांना पत्र व्यवहार केला आहे. एक पत्र त्यांनी ट्विट केले आहे. या पत्रातून त्यांनी पालिका आयुक्तांवरदेखील टीका केली आहे.
पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘या सगळ्याला जबाबदार कोण? पाणी द्या, पाणी द्या सांगून २७ गावं गेली अनेक वर्ष ऊर बडवतायत. पण तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमले त्यांच्या कानाशी तो आवाज पोहोचतच नाहीय. आमच्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणायचं आणि तेच पाणी पिऊन जगा असं सांगायचं. तहान भागवण्यासाठी आयुक्तांनी केलेली योजना तर नाही ना ही ? आता तर रडून भेकून डोळेही कोरडे पडले. आता काय ? अजून काही मृत्यू व्हायची वाट पाहायची का ? म्हणजे आणखी डोळ्यांतून पाणी येईल हो, पण नळाला येणार नाही. आमच्या जीवावर उठलेला असा आयुक्त आम्हाला नको शिंदे साहेब..’

सामान्य नागरिक म्हणून पत्र
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रस्ते, पाणी, वाहतूककोंडी, कचरा व इतर समस्या आपल्याकडे मांडण्यासाठी मी अनेक वेळा आपल्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन बैठक लावावी यासाठी विनंती केली आहे; परंतु यात कोणते राजकारण आडवे येते हे मला समजत नाही आणि जर तसे काही असेल तर राजकारण बाजूला ठेवू या आणि मृत्यूकारण तपासून पाहू या. आणि म्हणूनच मी आमदार असलो तरी हे पत्र मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला पाठवतो आहे, असे देखील पत्रात पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81879 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top