
ग्रामीण भागातील शाळांसाठी ‘आम्ही गिरगावकर’चा पुढाकार
प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : दुर्गम व ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांचे नूतनीकरण करून शिक्षणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती आणि शाळेतील भिंती विविध शैक्षणिक चित्रांनी रंगवून मुलांना बोलक्या भिंतीची अनुभूती देण्यासाठी ‘आम्ही गिरगावकर’ टीमने पुढाकार घेतला आहे.
आपल्या ग्रामीण भागातील शिक्षक अव्वल दर्जाचे आहेत, मात्र बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रंग उडालेल्या भिंती, खपली पडलेले फळे, गळके छप्पर, सदैव दुर्गंधी पसरविणारी प्रसाधानगृहे अशी परिस्थिती काही शाळांमधून दिसून येते. शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून आणि आम्ही गिरगांवकर यांच्या सहकार्याने ‘रंग दे माझी शाळा’ हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. यासाठी सारस्वत बँकेचे सर्वेसर्वा गौतम ठाकूर यांचा विशेष हातभार लागणार आहे.
लहानपणापासून मुलांना शिक्षणाची गोडी लागण्याकरिता प्राथमिक शाळेपासूनच शाळेतील वातावरण पोषक असणे आवश्यक आहे. ही बाब ओळखून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. ज्या कोणालाही या उपक्रमाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी मिलिंद वेदपाठक ९८२०७९५५८०, शिल्पा नायक ९८३३४३०१९४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आव्हान करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81883 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..