‘अन्वय’च्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अन्वय’च्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांचा सन्मान
‘अन्वय’च्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांचा सन्मान

‘अन्वय’च्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांचा सन्मान

sakal_logo
By

धारावी, ता. ११ (बातमीदार) : मुंबईसह देशभरात एकमेव तंत्रज्ञान-आधारित भारतातील वृद्धांची वैयक्तिक काळजी घेणारे व्यासपीठ असलेली ‘अन्वय’ ही संस्थेने सहा वर्षे पूर्ण केली आहेत. वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दीर्घकाळ सेवा करणारे कर्मचारी आणि सर्वोत्तम कामगिरी करणारे काळजीवाहू व्यवस्थापक आणि काळजी घेणारे समन्वयक यांना सन्मानित करण्यात आले.
भारतातील ७ शहरांमध्ये विविध माध्यमांतून सहा हजारांपेक्षा अधिक वृद्धांची आरोग्य आणि आपत्कालीन काळजी, सहवास आणि भावनिक काळजी, तसेच प्रवास आणि कायदेशीर सहाय्य यांसारख्या अनेक सुविधा वृद्ध व्यक्तींना पुरविण्यात येत आहेत. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासह संस्थेने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवल्या आहेत. संस्थेने येत्या काळात २५ विविध शहरात सुमारे एक लाख वृद्ध नागरिकांना सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तेलंगणचे माजी मुख्य सचिव एस. के. जोशी, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत रेड्डी, अन्वय किन केअरच्या संचालिका दीपिका रेड्डी आदी मान्यवरांनी संस्थेच्या ६ वर्षांच्या वाटचालीत भरीव योगदान दिले आहे. आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली सरासरी तीन मिनिटांत प्रतिसाद देते आणि गेल्या ६ वर्षांत अन्वयने ३५० हून अधिक आपत्कालीन कॉलपैकी ९७ टक्के वृद्ध व्यक्तींचा जीव वाचवण्यात मदत केली असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81885 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top