पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन
पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन

पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्यास आंदोलन

sakal_logo
By

खारघर, ता. ११ (बातमीदार) : महावितरणकडून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने घरी काम करणाऱ्या नोकरदारांना नाहक त्रास होत आहे. ही समस्या दूर करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने खारघरमधील महावितरण अधिकाऱ्यांना दिले.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात अनेक लोक घरांतून काम करत आहेत, तसेच काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशा वेळी महावितरणकडून कोणत्याही प्रकारची सूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे खारघरमधील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी खारघर महावितरण कार्यालयातील अधिकारी एम. आर. पाटील यांची भेट घेऊन भारनियमनामुळे भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची माहिती दिली. ज्या दिवशी वीजपुरवठा खंडित केला जात असेल, त्यांची माहिती नागरिकांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81891 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top