धान्य बाजारात तेजी नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धान्य बाजारात तेजी नाही!
धान्य बाजारात तेजी नाही!

धान्य बाजारात तेजी नाही!

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ ः धान्याच्या होलसेल बाजारात तेजी असल्याची हूल उठवण्यात येत असली तरी मुंबईतील किरकोळ बाजारात, गरिबांकडे फार पैसे नसल्याने अजिबात तेजी नाही, अशी माहिती मुंबई ग्रेन डीलर्स असोसिएशनचे रमणिकभाई छेडा यांनी ‘सकाळ’ला दिली.
सध्या केवळ बासमती तांदूळ आणि कोलम यांच्या दरात थोडी वाढ झाली आहे, इतर अन्नधान्यांच्या किमती उलट एक ते दोन रुपयांनी कमी झाल्या आहेत. पावसामुळे मिरची मसाला खराब झाल्यामुळे त्यांच्या दरावर परिणाम झाला. लिंबाचे भाव थोडे कमी झाले आहेत आणि रशिया-युक्रेन युद्ध संपल्यानंतरच तेलाचे दर थोडे उतरतील, असेही ते म्हणाले.
फेब्रुवारीच्या आसपास पडलेल्या पावसामुळे गुजरातमधील काठियावाड विभागातील गव्हाच्या दर्जावर परिणाम झाला. मात्र सध्या मुंबईत मध्य प्रदेशातून येणाऱ्या गव्हाचा दर्जा अत्यंत चांगला आहे, असेही त्यांनी दाखवून दिले. सरकारने ठरवलेल्या प्रतिक्विंटल दोन हजार रुपये या किमान आधारभूत दरापेक्षा (एमएसपी) घाऊक बाजारात शेतकऱ्यांना क्विंटलला २,१०० ते २,२०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सरकारला गहू देण्याऐवजी व्यापाऱ्यांना देत आहेत, मात्र सरकारकडे गव्हाचा जुना साठाही भरपूर आहे, असेही त्यांनी दाखवून दिले.
...
स्वस्त धान्य योजनेची जाहिरात करा!
गरिबांकडे पैसे नसल्याने किरकोळ दुकानदार धंदा मंद असल्याची तक्रार करीत आहेत. सरकारने रेशनवर स्वस्त दरात गहू-तांदूळ देण्याऐवजी ते पैसे गरिबांच्या बँक खात्यात सबसिडी म्हणून टाकावेत, असेही छेडा यांनी सुचवले. स्वस्त धान्य योजनेची पुरेशी जाहिरात झाली नसल्यामुळे अनेकांना त्याची माहिती नाही. त्यामुळे प्रत्येक रेशन दुकानावर त्याचे बोर्ड लावावेत, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81893 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top