५ वर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५ वर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा!
५ वर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा!

५ वर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा!

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. ११ (बातमीदार) : महापालिकेच्या डी विभागात कार्यरत असलेल्या दुय्यम अभियंत्यांची तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी सेवा होऊनही बदली होत नसल्याने यामागे नेमके काय कारण आहे, अशी विचारणा करीत वंचित बहुजन आघाडी पक्षाचे मलबार हिल तालुका अध्यक्ष अब्दुल खान यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे चौकशीची आणि कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात टाळाटाळ केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अब्दुल खान यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार महापालिका डी विभाग येथील इमारत व कारखाने विभाग या ठिकाणी कार्यरत असणारे दोन दुय्यम अभियंता गेली पाच वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. तीन वर्षांनंतर बदली करण्याचे नियम असूनही या दोन्ही अधिकाऱ्यांना एकाच विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. एकाच ठिकाणी अधिकाऱ्यास अधिक काळ ठेवल्यास त्याचे हितसंबंध निर्माण होऊन कामावार त्याचा परिणाम होतो. तो टाळण्यासाठी बदलीचा नियम आहे. मग या अधिकाऱ्यांची बदली का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी शहर अभियंता यांच्याशी बोलण्यास सांगितले. शहर अभियंता अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन बोलतो, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81894 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top