पावसाळी कामांच्या तयारीला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळी कामांच्या तयारीला सुरवात
पावसाळी कामांच्या तयारीला सुरवात

पावसाळी कामांच्या तयारीला सुरवात

sakal_logo
By

पनवेल, ता. ११ (बातमीदार) : या वर्षी पाऊस लवकर सुरू होणार असल्याचे संकेत वर्तवण्यात आल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पावसाळी कामांच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून अद्ययावत पंप, झाडे उन्मळून पडल्यास ती हटवण्यासाठी लागणारे कटर, मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे.

मान्सूनपूर्व कामे आणि आपत्ती व्यवस्थापनविषयक सूचना देण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार उपायुक्त सचिन पवार यांनी पालिकेतील विविध विभागांची आज बैठक घेतली. यावेळी सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, प्रभाग अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यापूर्वीची कामे, नालेसफाई, धोकादायक इमारती निष्कासित करणे, धोकादायक वृक्ष आणि फांद्या तोडणे, अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अधिकाऱ्यांना सूचना
शहरात नियंत्रण कक्ष स्थापन करणे, समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, आपत्ती काळात नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणांची निवड, औषधोपरांची पूर्तता करण्याच्या सूचना उपायुक्त पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81896 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top