विक्रीसाठी आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रीसाठी आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत
विक्रीसाठी आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत

विक्रीसाठी आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत

sakal_logo
By

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) ः गुंदवली गावात मटण विक्रेत्याने कोनगाव बकरा मार्केट येथून आणलेले ६५ बकरे मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार बुधवारी (ता. ११) समोर आला आहे. मटण विक्रेते अब्दुल माबुद कुरेशी यांनी तातडीने नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवश्री जोशी यांना संपर्क साधला असता, त्यांनी दोन मृत बकरे शेलार येथील पशुचिकित्सालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्याचे सांगितले. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असेही त्या म्हणाल्या
भिवंडी तालुक्यातील विविध गावांत सध्या देवीचा जत्रोत्सव सुरू आहे. यानिमित्त गावागावांत नातेवाईकांचा मोठा गोतावळा जमा होतो. या यात्रोत्सवानिमित्त कोंबडे व बकऱ्यांच्या जेवणाचा बेत घरोघरी असतो. गुंदवली गावातील गावदेवीची जत्राही बुधवारी असल्याने मटण विक्रेते अब्दुल माबुद कुरेशी यांनी सहा लाखांचे ५९ बकरे व १० मेंढे आणून रात्री आपल्या दुकानाशेजारी असलेल्या गाळ्यात चारापाणी देऊन बांधून ठेवले होते. आज सकाळी सहाला त्यांचा मुलगा दुकानात आला असता, त्यामधील ६५ बकरे मृतावस्थेत आढळून आले; तर चार जिवंत, परंतु तेही अत्यवस्थ स्थितीत आढळले.
दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश डॉक्टरांना दिले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81902 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top