भावे नाट्यगृहात रसिकांचा गजबजाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावे नाट्यगृहात रसिकांचा गजबजाट
भावे नाट्यगृहात रसिकांचा गजबजाट

भावे नाट्यगृहात रसिकांचा गजबजाट

sakal_logo
By

वाशी, ता. ११ (बातमीदार) : कोरोना निर्बंधावेळी असणारी सभागृहात ५० टक्के उपस्थितीची अट रद्द झाली आहे. त्यामुळे सिनेमा आणि नाट्य निर्मात्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. १०० टक्के उपस्थितीत कार्यक्रम घेण्यास मुभा देण्यात आल्यानंतर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाला पूर्वीसारखी झळाळी आली आहे. येथे नाटकांच्या प्रयोगांची, खासगी कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. परिणामी प्रेक्षकांची गजबजही वाढलेली दिसते.

विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकांच्या प्रयोगांसोबत सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रमही धूमधडाक्यात होत असतात. लावण्यांच्या कार्यक्रमापासून राजकारण्यांच्या सभा या ठिकाणी गाजल्या आहेत. मात्र कोरोना काळापासून हे सर्व बंद होते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यापासून नाट्यगृह सुरू करण्यात आले. तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी ५० टक्क्यांची अट होती. त्यामुळे हवा तसा उत्साह पाहायला मिळत नव्हता. आता १०० टक्के उपस्थितीला परवानगी दिल्याने नाट्यगृह पुन्हा गजबजू लागले आहे.

जूनपर्यंत ७५ टक्के सवलत
कोरोना काळात नाट्यसंस्थांना नाट्यगृहाच्या भाडेदरात ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात
आला. ही सवलत जूनपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे नाट्यसंस्थांना २५ टक्के शुल्क भरूनच नाट्यप्रयोग करता येत आहेत. परिणामी नाट्यगृहाला आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

नाटकांबरोबच खासगी कार्यक्रमांचे बुकिंगही होऊ लागले आहे. नाट्यगृहात येऊन नाटक पाहताना आम्हालाही आनंद होत आहे.
- सोनाली गुजर,
नाट्यरसिक.

प्रयोगांची संख्या वाढली आहे. सुट्यांच्या दिवशी तर तीनही वेळांचे बुकिंग होत आहे. दोन महिन्यांपर्यंतच्या तारखांचे बुकिंग होत आहे.
- गिरीश चावरे,
व्यवस्थापक, विष्णुदास भावे नाट्यगृह.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81905 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top