आजोबांना नांदी ऐकवली तो महत्त्वाचा क्षण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजोबांना नांदी ऐकवली तो महत्त्वाचा क्षण!
आजोबांना नांदी ऐकवली तो महत्त्वाचा क्षण!

आजोबांना नांदी ऐकवली तो महत्त्वाचा क्षण!

sakal_logo
By

रजनीकांत साळवी
प्रभादेवी, ता. ११ : माझा नवीन सिनेमा ‘तमाशा लाईव्ह’ची नांदी मी माझ्या आजोबांना ऐकवू शकलो, तो माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा क्षण आहे, अशी दिग्दर्शक संजय जाधव यांनी केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कामाच्या व्यापातून वेळ काढत गेल्या बऱ्याच वर्षांनी चिपळूण तालुक्यातील वारेली या आपल्या आजोळ असणाऱ्या गावी संजय जाधव यांनी भेट देत आजोबांचे आशीर्वाद घेतले. या वेळी लहान असल्यापासून ज्यांचे मार्गदर्शन घेत आलो असे आमचे आजोबा शाहीर पांडुरंग कदम यांच्याशी गप्पागोष्टी करत नवीन सिनेमाची झलक त्यांना दाखविली, असे जाधव यांनी सांगितले. लोककलेसाठी स्वतःला वाहून घेतलेले शाहीर पांडुरंग कदम यांनी आमची ही भेट अविस्मरणीय अशीच असल्याचे भावनिक होऊन सांगितले. कळत नव्हते तेव्हापासून माझ्या आजोबांची लोकगीते ऐकली होती. प्रत्येक म्युझिक सीटिंगला आजोबांच्या गाण्याचा रेफरन्स एकदा तरी येतोच.
...
शाहीर पांडुरंग कदम
माझे आजोबा शाहीर पांडुरंग कदम यांचे वय आता ९३ वर्षे आहे. ते सेवादलात होते. नांदी, पोवाडा, गोंधळ आणि अनेक लोकगीते मी त्यांच्याकडून पहिल्यांदाच ऐकली होती, असे संजय जाधव यांनी म्हटले आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81908 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top